गोंडपिपरी येथे महा-आवास अभियानाची कार्यशाळा संपन्न…

0
487

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)

गोंडपिपरी: आज दि.06 जानेवारी 2022 ला महा आवास अभियान- टप्पा अंतर्गत धनोजे कुणबी सभागृह, गोंडपिपरी येथे तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळा मा.सौ.वैष्णवीताई अमर बोडलावर जिल्हा परिषद सदस्या यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. तसेच प्रमुख उपस्थिती मा.सौ.भुमिताई चंद्रशेखर पिपरे पंचायत समिती सदस्या, मान.सौ.स्वातीताई वडपल्लिवार जी. प. सदस्या.सदस्या,श्री.दिपकभाऊ सदाशिव सातपुते प.स.सदस्य, मा.श्री. शेषराव बुळकुंडे गट विकास अधिकारी पंचायत समिती गोंडपिपरी,तसेच सन्मा.सरपंच,सचिव,रोजगार सेवक, लाभार्थी व इतर अधिकारी व कर्मचारी,यांचे उपस्थितीत संपन्न झाली.तसेच सदर कार्यशाळेत घरकुल बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here