१७ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू…गोंडपिपरी तालुक्यातील चेकदरूर येथील घटना..

0
1191

शरद कुकूडकर भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी: आज दि.4 जानेवारी रोज मंगळवारला चेक दरूर शेतशिवारात १७ वर्षीय युवकाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मृतक युवकाचे नाव गौरव उर्फ ​​डोनेश्वर गजानन नागापुरे रा.चेक दरूर वय १७ वर्ष असे आहे.

प्राप्त माहितीनुसार गौरव उर्फ ​​डोनेश्वर बैलाला पाणी पाजण्यासाठी शेतात गेला होता. शेतातील विहिरीतून पाणी काढत असताना त्याचा तोल गेला आणि तो विहारीत गेला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

घटनेची माहिती गोंडपीपरी पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. घटनास्थळी पोलीस कर्मचारी उपस्थित होऊन मृतक युवकाचे प्रेत विहिरी बाहेर काढले आहे. अतिरिक्त तपास गोंडपीपरी पोलिस स्टेशनचे अधिकारी जीवन राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here