प्रत्यक्ष मोबाईल EVM ने पार पडली शालेय बालपंचायत शालेय निवडणूक…सावित्रीबाई फुले हायस्कुल बाबूपेठ येथील उपक्रम…

0
210

चंद्रपुर: शालेय जीवनात विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने निरपेक्ष निवडणुक शासन प्रणालीबाबत जाणिव व्हावी. या एकमेव उद्देश्यासाठी, सावित्रीबाई फुले हायस्कूल,बाबूपेठ येथे प्रत्यक्ष Mobile Electronics Voting Machine द्वारे पारदर्शकपणे निवडणुक प्रक्रियेने पार पडली.

शालेय मंञिमंडळ निवडणूक प्रक्रिया मा. प्रशांत लोखंडे सर (SDPM) Magic Bus India Foundation. चंद्रपूर.यांच्या मार्गदर्शना खाली सावित्रीबाई फुले हायस्कूल, बाबूपेठ. येथील शालेय बालपंचायत तथा शालेय मंञिमंडळाची निवडणूक आज दिनांक:- 27 डिसेंबर 2021 रोजी सोमवार ला घेण्यात आली.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना निवडणूक नियोजनातील संपूर्ण प्रक्रिया रितसर समजावून सांगण्यात आली.आणि त्यानुसार निवडणूकीची अधिसुचना जारी करणे,फार्म भरणे,आक्षेप घेणे,माघार घेणे,चिन्ह वाटप करणे,प्रचार करणे,मतमोजणी या सा-या क्रिया कृतीद्वारे करुन दाखविण्यात आल्या.

प्रत्यक्ष Mobile EVM द्वारे मतदान घेण्यात आले.त्यानंतर मतमोजणी घेण्यात आली.मतदान निकाल घोषित करण्यात आला.प्राप्त मतदानानुसार बहुमताकडून कमीकडे जात मंञिमंडळ स्थापन करुन पदे शालेय मंत्रिमंडळ पदग्रहन व पदस्थापना करण्यात आले.

विजेत्यांचे पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन स्वागत करण्यात आले व शपथविधी घेण्यायात आले. प्रसंगी शाळेतील मुख्यध्यापक श्री.नीत सर (प्रशासकीय अधिकारी मनपा चंद्रपूर) मान. इरपाते सर निवडणू निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. तसेच भास्कर गेडाम सर, अरुण बालकी सर आणि मान. अंडेलकर मॅडम आणि सर्व शिक्षकवृंद यांनी निवडणूक अधिकारी म्हणून आपली जबाबदारी पार पाडली.

अत्यंत शांततेत व संसदीय पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली.निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी Magic Bus India Foundation. चे शाळा सहाय्यक अधिकारी,श्री.शंकर पराडकर सर,कु. स्नेहल श्रीकोंडावर , पल्लवी देठे व होमेश नांदेकर समुदाय समन्वयक. यांनी अथक परिश्रम घेतले.

शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम मोठ्या मनोरंजकतेने आणि उत्साहाने पार पाडण्यात आला. लोकशाही प्रणित,संविधानिक मार्गाने निवडणुक घेण्यात आली. निवडणुकीत विजेते उमेदवारांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. निवडणुक प्रक्रियेची सांगता राष्ट्रीय गान ने करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here