भंगाराम तळोधी येथील आरोग्य शिबिरात हजारो नागरिकांचा सहभाग… पात्र रुग्ण कृत्रिम भिंगारोपन शस्त्रक्रिये साठी सोमवारला होणार रवाना

0
175

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी : दरवर्षीप्रमाणे यंदाही सामाजिक बांधिलकी म्हणून लायन्स क्लब चंद्रपूर,लायन्स नेत्र हॉस्पिटल,कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम वर्धा,ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी,जि.प.आरोग्य विभाग चंद्रपूर आणि स्व.विमलताई नामदेवराव गोनपल्लीवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री ओम भगवती राईस मिल भंगाराम तळोधी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.26 डिसेंबर रोज रवीवारला श्री ओम भगवती राईस मिल भ.तलोधी येथे विनामूल्य मोतीबिंदू डोळे तपासणी शिबिर पार पडले.यात तालुक्यातील हजारोच्य संख्येने नागरिक सहभागी झाले. उद्या सोमवारला पात्र रुग्णावर कृत्रिम भिंगारोपन शस्त्रक्रिया होणार आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी गावात तेथील श्री ओम भगवती राईस मिलच्या आवारात नेत्र तपासणी, व कृत्रिम भिंगारोपन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर शिबिर दुपारी १२ वाजतापासून सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होते.

तालुक्यातील हजारो च्या संखने नागरिक सहभागी झाले. यादरम्यान विनामूल्य कृत्रीम भिंगारोपन मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील केली जाणार आहे. सोमवारला सेवाग्राम येथील तज्ञ वैद्यकीय चमूमार्फत डोळ्यांची शस्त्रक्रिया होईल.सदर शिबिराला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लायन्स क्लब इंटरनॅशनलचे सदस्य तथा सेवाग्राम येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अजयकुमार शुक्ला,चंद्रपूर येथील नेत्रचिकित्सक तथा सिव्हिल सर्जन डॉ.निवृत्ती राठोड,लायन्स क्लबचे प्रांताध्यक्ष राजेंद्रसिंग बघा,लायन्स क्लबचे प्रांताध्यक्ष राजेंद्रसिंग बग्गा,उपप्रांतपाल श्रवणकुमार,बलबीरसिंग बीझ,लायन्स क्लब चंद्रपुरचे जिल्हाध्यक्ष डॉ.श्रीकांत जोशी,जिल्हा सचिव दिलीप चांडक,गोंडपिपरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश चकोले,लायन्स क्लब चंद्रपुरचे प्रकल्प निर्देशक दिनेश बजाज,वैद्यकीय अधिकारी प्रशांत साळुंखे,स्वप्निल बडगे,अश्विनी चंद्रागडे आदी उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिराचे मुख्य आयोजक असलेल्या भंगाराम तळोधी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रतिष्ठित व्यापारी विवेक सावकार गोनपल्लीवार देखील मंचावर उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून भंगाराम तळोधी व परिसरातील नागरिकांच्या आरोग्यसंबंधी समस्यांचे निराकरण यावेळी होणार आहे.दरम्यान शिबिराला उपस्थित नागरिकांचा जेवण व राहण्याची व्यवस्था देखील गोनपल्लीवार यांच्याकडून करण्यात आली. . सदर आरोग्य शिबिरात हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित राहून शीबिराचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here