ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालयात STOP CANCER या विषयावर कार्यशाळा संपन्न.

0
150

नागपूर : ऑरेंज सिटी समाजकार्य महाविद्यालय, कोराडी रोड, नागपूर येथे दि. २२/१२/२०२१ ला STOP CANCER या विषयावर महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. राजेश दुर्गे (समुपदेशक तथा समन्वयक, STOP CANCER MISSION) हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार मेश्राम होते. या कार्यशाळेत डॉ. राजेश दुर्गे यांनी कॅन्सर म्हणजे काय, कॅन्सर कशामुळे होतो, कॅन्सरची लक्षणं, कॅन्सरचे प्रकार आणि या सर्वांपासून बचाव करण्यासाठी काय उपाय करावेत हे विविध उदाहरणे देऊन सविस्तरपणे सांगितले. त्याचबरोबर आपण आपली जीवनशैली कशी ठेवावी जेणेकरून आपण २०० प्रकारच्या कॅन्सरला होण्यापासून प्रतिबंध घालू शकतो याबद्दल देखील मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शालिनी तोरे यांनी केले तर आभार ग्रंथपाल कल्पना मुकुंदे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविका वाचनाने झाली आणि सांगता राष्ट्रगीताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here