टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा? राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपेंना अटक. सखोल चौकशी केल्यास बरेच मोठे मासे अडकण्याची शक्यता.

0
124

पुणे :  टीईटी पेपरफुटी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली आहे. पुण्यातील सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सायबर सेलने तुकाराम सुपे यांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलं होतं.

दरम्यान काही तास चौकशी केल्यानंतर त्यांना रात्री उशिरा पर्यंत अटक करण्यात आली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. या प्रकरणात आता अनेक मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेळ्या परीक्षांमध्ये पेपर फोडणारे आणि घोटाळे करणारे रॅकेट समोर येत आहे. म्हाडा पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेले आरोपी डॉ. प्रीतिश देशमुख यांचा घरी टीईटी परिक्षेत अपात्र झालेल्या 40 हून अधिक विद्यार्थ्यांची हॉल तिकीटे सापडली होती. तसेच डॉ. देशमुखच्या चौकशीमध्ये राज्य परीक्षा परिषदेच्या एका अतिवरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव पुढे आले होते. त्यानंतर संशयाची सुई राज्य परीक्षा परिषदेकडे वळली होती.

टीईटी परीक्षेची ओळखपत्र सापडल्यानंतर पुणे पोलिसांचा टीईटी परीक्षेतील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी एमएसईसीचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर काल दिवसभर व रात्री उशीरापर्यंत त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी सकाळी सुपे यास पोलिसांनी अटक केली, त्यास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here