विकासाच्या तिजोरीची खरी चाबी असलेल्या काँग्रेसला निवडून आणा – कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री, विजयभाऊ वडेट्टीवार

0
170

गोंडपिपरी: दिनांक१७/१२/२०२१ रोज शुक्रवारला दुपारी ३:०० वाजता गोंडपिपरी नगरपंचायत निवडणूक प्रचारार्थ जनता विद्यालयाच्या प्रांगणात तालुका काँग्रेस व शहर काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्य मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री मा.श्री. विजयभाऊ वडेट्टीवार व राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार मा.श्री. सुभाषभाऊ धोटे यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली भव्य प्रचार सभेचे आयोजन केलेले होते.
पाहुण्यांचे आगमन होताच ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक रॅली काढून शेकडो कार्यकर्त्यांच्या समवेत पाहुण्यांना सभा स्थळी पोहचविण्यात आले.
आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले की, जनतेला खोटे आश्वासने देऊन मूर्ख बनविण्यात भाजपा पटाईत आहे. गैस,पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल अश्या जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या महागाईला कारणीभूत केंद्रातील भाजप सरकार आहे. दिल्लीच्या तख्तावर बसून राज करणारे पूर्वी इंग्रजांचे पाय चाटत होते आणि आज स्वताला हिंदु बनवून घेतात, आम्ही हिंदू आहोत – हिंदुत्ववादी नाही असे राहुल गांधींनी सांगितलं ते खरं आहे. हिंदुत्ववादाची खरी भूमिका भाजपामध्ये असून आज जनतेत आग भडकवून भांडण लावण्याचे काम भाजपा करत आहे. बेनाहक दरवाढ करणाऱ्या या भाजपा सरकारला तेलात तळून फोळणी दिली पाहिजे, तिजोरीची चावी आमच्याकडेच आहे म्हणणार्‍यांची लबाड चाबी संपलेली आहे आता तीच खरी चावी काँग्रेसकडे असून गोंडपिपरी शहराचा विकास साध्य करायचा असेल तर काँग्रेसला निवडून आणा.असे आवाहन वडेट्टीवारांनी केले.
आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून तालुका विकासासाठी माझे सतत सहकार्य राहिलेले आहे.नगरपंचायतीवर काँग्रेसला एक हाती सत्ता सोपवा, पालकमंत्र्यांच्या सहकार्याने व माझ्या सततच्या प्रयत्नांनी विकास निधिला कुठेच कमी पडू देणार नाही. तलाव सौंदर्यीकरण असो, रस्त्याची दुरवस्था असो,शहराची इतर समस्या असो,त्या सर्व सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणार व हनुमान मंदिर बांधकामासाठी आमदार फंडातून १० लक्ष रुपयाचा थेट निधी जाहीर करत विविध विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाहीअसे आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी संबोधित करताना म्हणाले.
या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितेश मेश्राम यांनी कॅबिनेट मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार व आमदार सुभाष भाऊ धोटे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
प्रचार सभेला प्रामुख्याने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे, राजुरा चे नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे, अभिजित धोटे, कृउबास सभापती सुरेश चौधरी, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष तुकाराम झाडे, शहराध्यक्ष देवेंद्र बट्टे,युवक अध्यक्ष संतोष बंडावार,कार्याध्यक्ष निलेश संगमवार, महिला तालुका अध्यक्ष रेखा रामटेके,प्रा. शंभुजी येलेकर,देवीदास सातपुते, बाजार समिती उपसभापती अशोक रेचनकर, तुकेश वानोडे,सुनील संकुलवार, जितेंद्र गोहणे,सुनील फुकट, राकेश पुन,अजय माडूरवार, वनिता वाघाळे, रामचंद्र कुरवटकर,नामदेव सांगळे, तालुका काँग्रेस पदाधिकारी,नगरपंचायत निवडणुकीसाठी उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार,व गोंडपिपरी शहरातील तसेच तालुका परिसरातील नागरिकांची हजोरोंच्या संख्येने उपस्थिती होती.
सूत्रसंचालन सचिन फुलझेले यांनी केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक माडूरवारानी केलं तर रेखाताई रामटेके यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here