HomeBreaking Newsअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना...बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या विविध योजना…बेरोजगार युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर : आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकांचा आर्थिक विकास करणे आवश्यक आहे, त्याकरिता विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरू करण्यात आले. त्यामार्फत स्वयंरोजगारास इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करण्यात येते.

आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचून त्यांना सक्षम बनविणे, योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे हा या योजनेमागचा उद्देश आहे.

आतापर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील 70 युवकांना 3 कोटी 18 लक्ष 81 हजार 200 कर्जाचे वाटप महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

या आहेत योजना:

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-1), गट कर्ज व्याज परतावा योजना (आयआर-2) तसेच गट प्रकल्प कर्ज योजना (जीएल-1).

लाभार्थी पात्रता:

लाभार्थी उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 वर्ष तर महिलांकरिता जास्तीत जास्त 55 वर्ष आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापर्यंतच्या मर्यादेत असावे. लाभार्थ्यांनी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. एका व्यक्तीला केवळ एकदाच योजनेचा लाभ घेता येऊ शकेल.

आवश्यक कागदपत्रे:

लाभार्थ्यांचे आधार कार्ड (अपडेट मोबाईल क्रमांक व स्वतःच्या ई-मेल आयडीसह), रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला,लाईट बिल, रेशन कार्ड, बँक पासबुक), उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला. व प्रकल्प अहवाल आदी कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक राहील.

येथे करा अर्ज:

लाभार्थी www.udyog.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन स्वरूपात स्वतःचा अर्ज दाखल करू शकतात.

योजनांच्या अधिक माहितीसाठी 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, येथील कार्यालयात प्रत्यक्षपणे संपर्क साधावा. असे आवाहन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अमरीन पठाण यांनी केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!