मुलचेरा तालुक्यातील वेंगनूर येथील गावकऱ्यांनी श्रमदानातून केला रस्ता निर्माण…

0
210

ब्युरोचीफ प्रशांत शाहा
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील केंद्र बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेगडी या गावापासून अवघ्या बारा किमी अंतरावर असलेल्या मुलचेरा तालुक्यातील वेंगणुर या ग्रामपंचायतला जुळणारा मुख्य मार्ग हा चामोर्शी तालुक्यातील रेगडी या गावातून गेलेला आहे. परंतु या मुख्य मार्गावरील दीना नदीचा एक मोठा पूल या मार्गाचा अडथळा बनून बसलेला आहे.

भारत देश स्वतंत्र झाल्या पासून आज पर्यत कोणतेच लोकप्रतिनिधी या कडे लक्ष दिलेले नाही. म्हणून वेंगनूर येथील संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून एक निर्णय घेतला. पर्यायी मार्ग बनवण्याचा पायवाट असलेल्या रस्त्यावर दगड,मुरूम टाकून निर्माण केला आहे. नवीन रस्ता संपूर्ण गावकऱ्यांच्या सहकार्याने निर्माण करण्यात आला. एक नवीन रस्ता वेंगणुर या गावकऱ्यांनी केलेल्या अनोखा उपक्रमाचा सर्वत्र कौतुक केला जात आहे.

रेगडी वेंगणुर या रस्त्याची व दीना नदीवरील पुलाची निर्मिती करावी अशी मागणी वेंगणुर येथील उपसरपंच नरेश कांदो यांनी केला आहे. पर्यायी रस्ता निर्माण करतांना वेंगणुर येथील
सोन्या गावडे,मुनेस्वर नरोटे,वसंत गोटा,मंगु कांदो,पेका नरोटे,सिताराम मडावी,केसरी नरोटे,मनीषा कांदो,सुनीता मडावी,नंदा नरोटे,सुमनबाई कांदो, सुमित्रा नरोटे,विजयाबाई चंदेल व आदी गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here