Homeचंद्रपूरराजुरामहापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन

नागेश इटेकर,प्रतिनिधी

राजुरा: शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजुरा येथे सांस्कृतिक विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा. अविनाश जाधव उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून डॉ. इसादास भडके, तर, प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य, डॉ. एस. एम. वारकड, डॉ. आर. आर. खेराणी, प्रा. व्ही. के. शंभरकर उपस्थित होते.

सदर कार्यक्रमातून डॉ. भडके यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा आणि त्यांनी चालविलेल्या चळवळी, त्यांचे ग्रंथलेखन यातून व्यक्त केलेले विचार आणि त्यातून व्यक्त होणारी राष्ट्रीयता मांडली. कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा. शंभरकर यांनी मांडले,संचालन, डॉ. संजय लाटेलवार,यांनी केले तर आभार डॉ. सारिका साबळे, यांनी मानले.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. वारकड यांच्या मार्गदर्शनात सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, डॉ. लाटेलवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. वनिता वंजारी, डॉ. वर्षा डांगे, डॉ. सारिका साबळे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, महाविद्यालयातील, सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे संपन्न झाला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!