चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथे महापरिनिर्वाण दिन उत्साहात साजरा

0
222

नागेश ईटेकर प्रतिनिधी

श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथील”राष्ट्रीय सेवा योजना”विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून महापारिनिर्वाण दिन आज दि. 06 डिसेंबर 2021 रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग होता . हा कार्यक्रम प्राचार्य डॉ. चक्रधर ए. निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आणि यांनी महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी का आयोजित केला जातो हे सविस्तर सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक ‘बोधिसत्व’ मानतात.डॉ. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला असे प्रतिपादन केले आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. प्रदीप चौधरी सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त १ डिसेंबर पासून मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. चैत्यभूमी येथे २५ लाखाहून अधिक भीमानुयायी जमा होतात, व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी भारत तसेच जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे (बौद्ध मंदिरे), स्वतःच्या घरी, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात असे मार्गदर्शन केले तसेच प्रमुख वक्ते प्रा.डॉ. संजय सिंग यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या महापारिनिर्वाण दिनाच्ये आयोजन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार आणि रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. अविनाश वि. चकिनारपूवार व सहकार्यक्रम अधिकारी प्रा. उमेश वरघणे आणि डॉ. रुद्रप्रताप तिवारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रा.महेंद्र अक्कलवार सरांनी केले आणि आभार प्रा.उमेश वरघणे सर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. प्रतीक बेझलवार, प्रा. शरद लखेकर , प्रा. पूनम चंदेल, डॉ. जगदीश गभने, डॉ. हरिओम सिंग तोमर, डॉ. आशिष चव्हाण, प्रा.संजय कुमार, प्रा.नामेवार सर, प्रा.चौधरी मॅडम, कु. लाभसेटवार मॅडम, कु. निमघडे मॅडम, ग्रंथपाल कु. नलिनी जोशी मॅडम, प्रा. पुपलवार सर, प्रा. फरकडे मॅडम, श्री. विजय मेसरे, श्री. कृष्णा वासलवार, श्री कोवे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here