गोंडपिपरी येथे शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन..

0
234

दि.४ (शनिवार) गोंडपीपरी येथे नगर पंचायत जवळ शिवसेना पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.समोर 21 तारखेला होऊ घातलेल्या नगरपंचायत निडणुकपूर्वी उद्घाटित करण्यात आलेल्या या जनसंपर्क कार्यालयामुळे शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले , असुन यामुळे निश्चितच याचा फायदा पक्षाला होईल असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला.यावेळी गोंडपीपरी नगर पंचायतीत शिवसेने ची सत्ता बसवायची म्हणजे शंभर टक्के बसवायची असा चंग शिवसेना जिल्हा उपप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदिप करपे यांनी बांधला आहे.

शिवसेना पक्ष कार्यालयाचे उद्घाटन संदीप करपे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.यावेळी
शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार, शिवसेनेचे जेष्ठ नेते सुनील संकुलवार, ता रडा गाव चे सरपंच तरुण उमरे,शिवसेना तालुका संघटक शैलेश बैस,शिवसेना शहर अध्यक्ष आनंदराव गोहणे,शहर उपप्रमुख रियाज कुरेशी,शहर संघटक नरेंद्र इंगोले,शहर उप संघटक बब्बू पठाण,शहर समनव्यक बळवंत भोयर, नितिन धानोरकर,शिवसैनिक अशपाक कुरेशी, विवेक राणा, सचिन नगारे, ओमप्रकाश मडावी, जाकीर शेख, नितिन रागिरकर,कार्तिक कन्नके, ज्ञानेश्वर सोंटके, अधिराज देवगडे चेतन रामगिरकार, जुनेद कुरेशी तुकाराम सातपुते,श्री रियाज शेख,प्रमोद तुमडे, महेश गोलाईत,अरविंद बरे,सुधीर अवथरे चंद्रशेखर बावनकसे, शुभम भोयर,चिलनकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here