हजरत टिपू सुलतान फौंडेशन शाखा राजुरा द्वारा ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी तथा सामाजिक संस्थांचा सत्कार’

0
47

राजुरा: शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या २७१ व्या जयंती निमित्त,दिनांक २७ नोव्हेंबर २०२१ ला कन्नमवार सभागृह राजुरा येथे,हजरत टिपू सुलतान फौंडेशन शाखा राजुरा द्वारा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थी तथा विविध सामाजिक संस्थांचा सत्कार’कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून मा. अमोल गर्कल, उपविभागीय वन अधिकारी राजुरा, अध्यक्ष म्हणून मा अमजद पापाभाई शेख,संस्थापक अध्यक्ष हजरत टिपू सुलतान फौंडेशन चंद्रपूर, मा श्रीमती अर्शिया जुही मॅडम मुख्याधिकारी नगर परिषद घुग्घुस हे सत्कार मूर्ती होते.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून खद खद फेम लाव्हारस मास्तर, फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संस्थापक,मा प्रा. नितेश कराळे आणि वैचारिक व्यक्तिमत्व,इतिहास अभ्यासक,लेखक असा होता टिपू सुलतान मा सरफराज अहमद,सोलापूर हे होते.वक्त्यांनी अतिशय प्रभावी मार्गदर्शन करून प्रेक्षकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी,व्यक्ती व सामाजिक संस्थां इत्यादी 50 जणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वरुर रोड येथील युवा सामाजिक कार्यकर्ता विशाल शेंडे याचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात,प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक मा.प्रा.डॉ.संभाजी वरकड सर ,मा.श्री विजय परचाके साहेब,गटशिक्षणाधिकारी,मा मुजावर अली सर,सायबर सेल,म.पो.चंद्रपूर,डॉ येरमे दाम्पत्य,श्री अस्लम चाऊस,इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन मुसा चांदसाहाब शेख,सदस्य HTSF राजुरा यांनी केले.तर आभार प्रदर्शन शहबाज खान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष अस्लाम चाउस,शोएब शेख,रियाज शेख, नदीम शेख,मुसा शेख,जलाल बियाबानी,जफर खान,स्वप्नील रामटेके व इतर सर्व सदस्य हजरत टिपू सुलतान शाखा राजुरा यांनी अतोनात परिश्रम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here