मेट्रो स्टेशनवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा एकेरी उल्लेख तात्काळ बदलवा

0
37

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण भारतातील एक पूज्यनिय व्यक्तिमत्त्व आहेत. संपूर्ण भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदराच्या दृष्टिकोनातून पाहिल्या जाते. सर्व समाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना नतमस्तक आहे. असे असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सी.ए. रोड येथे महामेट्रो द्वारा स्टेशनवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नावाचा एकेरी उल्लेखाचा मोठा फलक लावण्यात आला. त्यामुळे समाजमन दुःखावले गेले. समाजाच्या दुखावलेल्या भावना लक्षात घेता महामेट्रोद्वारे सदर फलक तात्काळ बदलविण्यात यावे यासंदर्भात संस्थेद्वारे नारे-निदर्शने करण्यात आले. तसेच एकेरी नावाचा उल्लेख बदलवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर करून नव्याने लावण्यात यावा याबाबत मा. जिल्हाधिकारी तसेच व्यवस्थापकिय संचालक, महामेट्रो, नागपूर यांना सुगत वाचनलाय संस्था, बाबुळबन, गरोबा मैदान च्या निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना भदंत डॉ. संघघोष, मुकेश मेश्राम, विलास मेश्राम, बबलू नितनवरे, स्वप्निल मेश्राम, बाबाराव रंगारी, मंगला तिरपुडे, कुंदलता मानवटकर, प्रमिला बागडे, राकेश खोब्रागडे, विजय गोंडाणे, धर्मपाल गोंगले, बाल्या मेश्राम, धर्मपाल आवळे, आशिष फुलझेले आदि उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here