तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयात शालेय समुपदेशनाच्या डिप्लोमाचे उद्घाटन

0
271

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

रोटरी क्लब नागपूर आणि समाजकार्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या डिप्लोमा इन स्कुल काउंसेलिंग अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा चिटनविस सेंटरच्या ‘मिमोसा’ सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अनुषंगाने उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे लाभले होते. उद्घाटकीय भाष्य करतांना ते म्हणाले की, डिप्लोमा इन स्कुल काउंसेलिंग अभ्यासक्रमाचे औचित्य साधून तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाने महनीय कार्य केले आहे. उद्याचा चांगला समाज घडवायचा असेल तर आजचा बालक सुदृढ असणे आवश्यक आहे. या हेतूने समुपदेशन अभ्यासक्रमाने उद्दिष्ट्ये साध्य केल्या जाणार आहे. या प्रसंगी मेडिकल अधिक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी म्हणाले, समुपदेशन ही काळाची गरज आहे. नागपूर शहरात पहिल्यांदाच शिक्षकांकरिता शालेय समुपदेशनाचा डिप्लोमा कोर्स सुरु होत आहे ही बाब विशेष कौतुकास्पद आहे. तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्वाती धर्माधिकारी यांनी स्कुल काउंसेलिंग डिप्लोमा कोर्स बद्दल सविस्तर माहिती श्रोत्यांना अवगत करून दिली. अध्यक्षीय भाषण करतांना श्री. शब्बीर शाकीर म्हणाले की, उपरोक्त कोर्स चे गांभीर्य लक्षात घेऊन यशस्वी वाटचाल करण्यासाठी अथक परिश्रम आणि वेळेचे नियोजन करावे लागेल. कारण समस्यांना समजून घेणे त्याचा स्वीकार करणे, त्याबाबत सचोटीने कार्य करणे अतिशय महत्वाचे असेल. समाजाची धारणा बदलणे,(माईन्ड सेट) तेवढेच आवश्यक आहे. तेव्हाच समाजातील लोकांच्या समस्या उजागर करता येतील समस्यांचे निराकरण होणे गरजचे आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिता अग्रवाल, अध्यक्ष, ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट, रोटरी क्लब ऑफ नागपूर यांनी केले. त्या बोलताना म्हणाल्यात की, दोन वर्षाच्या अवधी करिता ‘ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट’ हा शालेय विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ या विषयाला लक्ष्य करून ‘वेलनेस इन अ बॉक्स पिअर लिडरशीप अन्ड प्रिव्हेन्शन ऑफ डिप्रेशन’ या नावाने कार्य करीत आहे. विशेष बाब म्हणजे रिता अग्रवाल यांच्याच पुढाकाराने आंतरराष्ट्रीय निधी रोटरी क्लब ऑफ नेपल्स कडून प्राप्त झाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. शिल्पा पुराणिक तर आभार प्रदर्शन श्री. तनवीर मिर्झा यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. संध्या फटिंग यांनी करून दिला. कार्यक्रमाला रोटरी क्लबचे विविध पदाधिकारी व विविध शाळा,महाविद्यालय यांचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक आवर्जून उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here