Home Breaking News गडचिरोली पोलिसांनी गावातील गोरक्षकांच्या मदतीने गोतस्करांच्या आवळल्या मुसक्या…दुर्गम भागात मोठी कारवाई

गडचिरोली पोलिसांनी गावातील गोरक्षकांच्या मदतीने गोतस्करांच्या आवळल्या मुसक्या…दुर्गम भागात मोठी कारवाई

1061

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तहसील मधील पेंढरी पोलीस स्टेशनने आज दिनांक 21 नोव्हे. ला रात्री मिळालेल्या माहितीनुसार 5 ते 6 मालवाहक गाड्या पकडून जवळपास 135 ते 140 गोवंश त्यामध्ये 90 गायी व 45 बैल हे ताब्यात घेऊन तब्बल 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. पूर्ण 8 आरोपी पैकी 5 आरोपी नावे अब्दुल समीर जाहीर शेख राह. राजुरा चंद्रपूर, जमीर शेख दस्तगिर राह. वाकडी असिफाबाद, सखा उल्ला खान राह. राजुरा चंद्रपूर, पुनीत चतुर राह.आष्टी चामोर्शी, रमेश रेकुलवर राह.वाकडी असिफाबाद अश्या आरोपींना पकडण्यात पोलीस विभागाला यश आले आणि उर्वरित 3 आरोपी नावे हसन शेख राह.असिफबाद, तरुण हलदार छ.ग., रवी नैताम राह. चंद्रपूर हे पळून जाण्यात यशस्वी झाले.


गडचिरोली जिल्ह्यातील मुरुंमगाव व जारावंडी-पेंढरी अश्या दुर्गम जंगली भागातून मोठ्या प्रमाणात गोवंशाची तस्करी खुलेआमपने चालू असून गोवंश वाहून नेणाऱ्या गाड्या खुलेआमपने गाव पार करून कत्तलखाना कडे जात आहेत, पण मागील काही दिवसांपासून गडचिरोली शहरातील गोरक्षकानी याचा प्रखर विरोध करून जिल्हा प्रशासनासमोर निर्दशने आणि त्या वर कठोर करवाईची मागणी केली होती. त्या वरून गोतस्करांनी तस्करी चा मार्ग बदलवून गोवंश हे तेलंगणा ला कत्तलखाना साठी जारावंडी- पेंढरी- कारवाफा – पोटेगाव- कुणघाडा- चामोर्शी- आष्टी किंवा हरणघाट या मार्गाने गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर जात होते. याची माहिती गोरक्षकांना संमजतास त्यांनी पोलीस प्रशासनाला माहिती देऊन पोलीस विभागाने केलेली ही उचित कारवाही ही प्रशंसनीय आहे.

Don`t copy text!