सिंधी येथील शेतकरी सोमा दामेलवार ने आत्महत्या करून संपविले जीवन

0
243

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा सिंधी येथील शेतकरी सोमा मल्ला दामेलवार वय वर्ष ६१ याने स्वतः च्या सर्वे नंबर २६६ मध्ये दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ रोजी सततच्या नापिकी ला कंटाळून नैराश्यातून आत्महत्या करण्यासाठी विष प्राशन केले. सदर घटनेची माहिती मुलगा राजकुमार दामेलवार याला झाली. त्याने काही स्थानिक नागरिकांची मदत घेऊन ताबडतोब सरकारी दवाखाना चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान दिनांक ८ नोव्हेंबर रोजी रात्री १ वाजता सोमा दामेलवार यांचे दुःखद निधन झाले. त्याचेवर बँक ऑफ इंडिया विहिरगाव आणि सीडीसीसी बँक विरूर स्टेशन चे कर्ज असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे. त्यामुळे नापिकी सोबतच कर्ज फेडण्यात येत असलेली असमर्था सुध्दा या आत्महत्येस कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here