रक्तदान करुन शुभमने पार पाडले सामाजिक दायित्व…

0
82

गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी

आरमोरी –
आज परत एकदा अत्यावश्यक रक्तदानासाठी रक्तदात्यांची गरज भासली असता अचानक मित्र चंचल रोहनकर याचा कॉल आला म्हणाला, दादा अनिकेत दुर्गे दादानी तुमच नाव सांगितले, की काहीच क्षणात ते तूम्हाला रक्तदाता उपलब्ध करून देतील दादा थोड अत्यावश्यक आहे पेंशट ला डोनर लवकर मिळणे, त्यामुळे मला दोन मिनिटात कळवावे. अगदी काही मिनिटात डोनर मिळणे, आता तरी कठीन होतं कारण दिवाळी मुळे गडचिरोली येथील आमचे बरचसे डोनर मित्र गावाकडे गेले होते. मी लगेच गोवर्धन दादा पत्रे यांना Callकेला कारण रक्ताची गरज भासल्यास आवर्जून सांग ते मला आधीच रक्तदानासाठी जायचय म्हणून सांगीतले होते. पण ते चिंचोलीला होते तरी ते जायला तयार होते पन चिंचोली ते गडचिरोली अंतर फार होते ईतका वेळ पेशंटकडे नव्हताच त्यांना अत्यावश्यक रक्ताची गरज होती सांगीतले असतांना मी वेळेची रीस्क घेऊ शकत नव्हतो दादाला कळवितो म्हणून सांगीतल. नंतर लगेच गडचिरोली सुरज कुमरे ला लगेच कॉल केला तर त्याच्याकडून कळाल की, आमचे दोन मीत्र म्हणजेच शुभम नखाते आणि योगाजी कांबळी गडचिरोली येथे आलेलेत. लगेच शुभम लाCallकेला तो घरच्या होणार्या कार्यक्रमा प्रसंगीचे पत्रीका वाटप करण्यास मुरखड्याला गेला होता, कॉल करताच संपूर्ण परिस्थिती सांगत त्याला रक्तदानाबद्दल कडवल वेळ वाया न घालता वेळेचे भान ठेवून शुभम नी लगेच शासकीय रुग्णालय गाठलं व गरजूंना वेळेत रक्तदान करून आपलं सामाजिक दायित्व पार पाडलं.अभिमान आहे अश्या मीत्रांचा जे गरजूंसाठी मदतीला नेहमी तत्पर असतात….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here