रामपूर गोवरी व कापनगाव-आर्वी मार्ग खड्डेमुक्त करा.. संकल्प फाउंडेशनच्या निवेदनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणी.. १५ दिवसात मार्ग सुरळीत करा अन्यथा आंदोलन करण्याचा दिला इशारा.

0
162

राजुरा: तालुक्यातील रामपूर, गोवरी व कापनगाव-आर्वी मार्गावर असंख्य जीवघेणे मोठे मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावरून अनेक नागरिकांना प्रवास करावा लागतो आहे. नागरिकांना प्रवास करतावेळी स्वतःचा जीव मुठीत धरून हा प्रवास करावा लागत आहे.

रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते आसा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर या मार्गावरून प्रवास करतांना रामपूर, माथरा वळणावर काही दिवसापूर्वी अपघात झाला व त्यात २ लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणखी अपघात होऊ नये, अपघाताचे प्रमाण कमी व्हावे म्हणून या समस्येची दखल घेण्यात यावी यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला संकल्प फाऊंडेशन यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले. व त्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर काम सुरु करू असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी प्रामुख्याने संकल्प फाउंडेशनचे सुरज गव्हाने, उज्वल शेंडे, उत्पल गोरे, दिपक झाडे, साईनाथ पिंपळशेंडे, अंकुश मस्की, प्रशांत पारखी, वैभव अडवे, वैभव महाकुलकर, दिनेश वैरागडे, गितेश कौरासे, ओमप्रकाश काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here