गोंडपिपरीत् आठवडी बाजाराला परवानगी का नाही ?

0
239

सुनील डी डोंगरे (गोंडपिपरी प्रतिनिधी)

गोंडपिपरी:जिल्ह्यांतील आणि तालुक्यातील अनेक नगरांतील आणि गावातील आठवडी बाजार भरत आहेत ,मात्र गोंडपिपरीतिल् आठवडी बाजाराला प्रशासनाने अद्यापहि परवानगी दिलेली नाही.यामागील कारण काय अशी विचारणा नगरांतील लोक करत आहेत.

covid मुळे आठवडी बाजार प्रशासनाने बंद केले.नंतर स्थितीत सुधारणा झाल्याने नियमात शिथिलता करण्यात आली.काही दिवसांपूर्वी जिल्हाप्रशासनाने ठिकठिकानि भरणाऱ्या आठवडी बाजारांना हिरवी झेंडी दाखवली !
सध्या जिल्ह्यातील अनेक नगरात आणी गावा त् आठवडी भरत आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातिल् अनेक गावात सध्या आठवडी बाजार भरत आहेत .
मात्र अद्यापपावेतो गोंडपिपरी नगरातिल् आठवडी बाजार बंदच आहे.बाजार बंद असल्याने छोट्या छोट्या व्यवसायिकांचे मोठे नुकसान होत आहे.बाजारात स्वस्त भाजीपाला उपलब्ध होत होता,आता ज्यादा दराने भाजीपाला विकत घ्यावा लागत आहे.
सर्वत्र आठवडी बाजार भरत असताना गोंडपिपरीतच् बाजाराला परवानगी का नाही अशि विचारणा नगरातील जनता करित आहे.
लवकरात लवकर आठवडी बाजाराला हिरवी झेंडी दाखवून अनेकांना दिलासा द्यावा अशी नगरवासीयान्ची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here