रक्तदान सामाजिक चळवळ व्हावी- वनिताताई तिरपुडे…तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन..६४ रक्तदात्यांनी केले रक्तदान…

0
251

दिनेश मंडपे
नागपूर जिल्हा प्रतिनिधी

नागपुर: तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय आणि नाशिकराव तिरपुडे ब्लड बँक उत्तर नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबीरासाठी तिरपुडेच्या रा.से. यो. विभागाने आणि महाविद्यालयातील एम.एस.डब्लू अंतिम वर्ष (वैद्यकीय व मानसोपचार समाजकार्य) च्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय येथे निशुल्क आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीर आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या अनुषंगाने उद्घाटक म्हणून भाऊराव मुळक आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉ. मुकुंद दिवे उपस्थित होते. उद्घाटकीय वक्त्यव्य करताना त्यांनी आवाहन केले की, कोरोनाच्या काळात रक्ताच्या आवश्यकतेनुसार रक्तपेढ्या रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे रक्तबँकांना पूर्ववत आणण्यासाठी सर्वांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे. याची उपस्थितांना जाणीव करून दिली.

व्यासपीठावर युगांतर शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा वनिता तिरपुडे आवर्जून उपस्थित होत्या. त्या व्यासपीठावरून बोलताना म्हणाल्यात की,रक्तदान ही सामाजिक चळवळ व्हावी जेणेकरून रसातळातील गरजू व्यक्तीना वेळीच रक्तपुरवठा करता येईल त्यासाठी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना रक्तदानासाठी प्रोत्साहन दिले.

डॉ.अमित सहानी बोलताना म्हणाले, रक्तदानासाठी चांगला व्यक्ती बनण्याचे स्वप्न बाळगून रक्तदान केल्यास इतरानाही अधिक प्रोत्साहन देता येईल त्यासाठी सर्वांनी रक्तदानाचे महत्व समजून घेण्यासाठी प्रबोधन कले.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्वाती धर्माधिकारी शिबिराला उद्बोधित करताना म्हणाल्या की दिवसेंदिवस रक्तदानाची आवश्यकता लक्षात घेवून एकमेकांना साहनभूतीने जोडण्याचा तो मार्ग आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने सातत्याने रक्तदानाचे आयोजन करून रक्तपेढ्यांना जास्तीत जास्त रक्तपुरवठा करणे हे महाविद्यालयाचे ध्येय असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

प्रसंगी व्यासपीठावर युगांतर शिक्षण संस्थेत जनरल सेक्रेटरी श्री. गणेश गौरखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. रक्तदान शिबिर कार्यक्रमाच्या निमित्ताने एकूण ६४ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रसेवेत योगदान दिले.विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रा. नायर, प्रा. गुलाक्षे , प्राचार्य अवसरे अगत्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे मोठया प्रमाणात तिरपुडे समाजकार्य महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रा.से.यो.चे पदाधिकारी प्रा. दिगांबर टूले व डॉ.अर्शिया हकीम, एम.एस.डब्लू अंतिम वर्षाचे पूजा अहिरे, निशिदा फटींग, प्राची भिवनकर, दिक्षा नेहारे, रंजित बघेल, शुभम गोरे, नवनीता शेरियो, काजल कांबळे, मोनिका ढोले, विशाल सोनटक्के या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here