दारुबंदी जिल्ह्यात चारचाकी वाहन सह १८०० नीपा दारुसाठा पकडला…साडे ४ लाखाचा मुद्देमाल जप्त

0
239

चक्रधर मेश्राम (सहसंपादक)

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात दारू बंदी असली तरी केवळ कागदोपत्रीच आहे. गडचिरोली पोलिस ठाण्यात दुपारच्या वेळी एका गोपनीय माहिती देणाऱ्या खबऱ्या मार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड मार्गे एका चारचाकी वाहनातून अवैध मार्गाने दारू वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने लगेच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अरविंद कतलाम यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक स्वप्नील गोपाले यांनी नियोजन बध्द सापळा रचून आरोपीला चारचाकी वाहनासह पकडण्याचा प्रयत्न केले असता, आरोपीने चारचाकी वाहनासह पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.

सदर कारवाईत दारू साठा घेत पळून जाणाऱ्या अल्टो कार चा फिल्मी स्टाईलने दहा किलोमीटर पाठलाग करून ३ आरोपींना पकडण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले . तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर महाराष्ट्र दारू बंदी नियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here