Home गडचिरोली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोग्य मंत्र्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा--आमदार डॉ. देवरावजी होळी..

विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोग्य मंत्र्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा–आमदार डॉ. देवरावजी होळी..

गडचिरोली : राज्यातील आरोग्य विभागाच्या गट ‘क’ व ‘ड’ संवर्गातील परीक्षा दिनांक 25 आणि 26 सप्टेंबर असे दोन दिवस निश्चित करण्यात आल्यानुसार विद्यार्थ्यांनी मिळेल त्या साधनाने कशीबशी व्यवस्था करून आपले परीक्षा केंद्र गाठले परंतु अचानक काल रात्री परीक्षा रद्द केल्याचे आरोग्य मंत्र्यांनी जाहीर केले ही विद्यार्थ्यांची शुद्ध फसवणूक असून अशाप्रकारे दुसऱ्यांदा विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोग्य मंत्र्यावर ४२० चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली आहे.

या पूर्वीही आरोग्य विभागाने विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावुन अशाप्रकारे अचानक परीक्षा रद्द केलेली आहे वारंवार विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर बोलावून परीक्षा रद्द करणाऱ्या या ठाकरे सरकारचा जाहीर निषेध करीत असल्याचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी म्हटले आहे.

गडचिरोली सारख्या अतिदुर्गम सिरोंचा ,भामरागड अहेरी धानोरा या भागातील विद्यार्थ्यांना पुणे, मुंबई नागपूरसह दुसऱ्या राज्यातील मोठ्या शहरात परिक्षा केंद्र देण्यात आले. त्यानुसार दोन दिवसापूर्वीच परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यानी परीक्षा केंद्रावर जाऊन सज्ज होते. परंतु राज्य सरकारने अचानकपणे परीक्षा रद्द केली. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी प्रवासावर राहण्यावर केलेला खर्च वाया गेला असून त्यांच्या खर्चाची भरपाई शासनाने करावी व यापुढे परिक्षा घेतांना प्रत्येक जिल्ह्यात परिक्षा केंद्र देण्यात यावे अशी मागणीही आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केली.

परीक्षा रद्द करण्यात आली याचे स्पष्ट कारण देखील राज्य सरकारने दिलेले नाही जेव्हा वाटेल तेव्हा परीक्षा घोषित करायची आणि जेव्हा वाटेल तेव्हा रद्द करायची हा ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचा हुकूमशाहीपणा राज्यातील विद्यार्थी सहन करणार नाही. राज्यमंत्र्यांनी परीक्षा बाबत नेहमीच साशंकता निर्माण करून परीक्षा घेताना यापूर्वीही नियोजित वेळेपूर्वी परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ मांडला असून त्यांच्यावर तातडीने फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केली आहे

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

नक्षलवाद्याकडून वाहनांची जाळपोळ

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यामधल्या हालेवारा पोलीस मदत केंद्रांतर्गत सुरू असलेल्या रस्ते बांधकामावरील वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मवेली ते मोहुर्ली...

डॉ. अनिल रुडे लोकमत टाईम्स एक्सलेन्स इन हेल्थकेअर पुरस्काराने सन्मानित…

गडचिरोली/ चक्रधर मेश्राम: हृदयाशी जवळचे नातं असलेले गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून कार्यरत असलेले , अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कार्यरत असलेले...

घोट-रेगडी रस्त्याचे नूतनीकरण सुरू आहे पण रुंदीकरणाचे काय? परिसरातील नागरिकांचा मोठा सवाल..

विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा चामोर्शी: चामोर्शी तालुक्यातील घोट ते रेगडी व घोट ते चामोर्शी या रस्त्याची मागील काही वर्षांपासून खूब बिकट परिस्थिती झालेली होती. घोट...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!