धारदार शास्त्राने वार करत बांधकाम कामगार महिलेचा खून

0
285

प्रतिनिधि,
दिलीप सोनकांबळे

देहूरोड : धारदार शस्त्राने डोक्यात वार करत एका महिलेचा खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी (दि. 16) सायंकाळी सहाच्या सुमारास किवळे येथे घडली.

सौदव सोमेरू उरव (वय 40) सध्या रा. किवळे, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिला तिच्या पतीसह किवळे येथे राहत होती. तिचा भाचा देखील त्यांच्यासोबत राहत होता. गुरुवारी सकाळी पती आणि भाचा नेहमीप्रमाणे कामावर गेले होते.

त्यानंतर महिला देखील जवळच असलेल्या बांधकाम साईटवर कामाला गेली.

सायंकाळी पती कामावरून घरी आला. वेळ होऊनही महिला कामावरून घरी आली नसल्याने पतीने जाऊन पाहणी केली. त्यावेळी महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच देहूरोड आणि रावेत पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here