HomeBreaking Newsग्रामीण गृहनिर्माण अभियंता एसबीच्या जाळ्यात .... दोन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

ग्रामीण गृहनिर्माण अभियंता एसबीच्या जाळ्यात …. दोन हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

 

दिपक साबने,जिवती प्रतिनिधी

जिवती: पंचायत समिती जिवती जिल्हा परिषद चंद्रपूर येथील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता  आशिष उत्तमराव शिंदे (३२) यांना दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने रंगे हात पकडले.
धोंडाअर्जुनी येथील तक्रारदार यांच्या वडील व आजोबा यांच्या नावे पंतप्रधान आवास घरकुल योजनेचे प्रत्येकी एक लाख ४८ हजार रुपये असे एकूण दोन लाख ९६ हजार रुपये घरकुल बांधकामाकरीता मंजूर झाले होते. घरकुल बांधकामाचा तिसऱ्या टप्प्याचे अंतर्गत मिळणारे प्रत्येकी ४५ हजार रुपये असे एकूण ९० हजार रुपये मिळणाऱ्या बिलाची मागणी केली असता ग्रामीण गृहनिर्माण अभियंता  उत्तमराव शिंदे (३३) हे घराच्या बांधकामाची स्थिती पाहण्यासाठी तक्रादाराच्या घरी गेले आणि बिलासाठी दोन हजाराची मागणी केली. तक्रार दाराची दोन हजार रुपये देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपूर येथे जाऊन तक्रार नोंदवली.
पोलीस निरीक्षक शिल्पा भरडे यांनी अत्यन्त गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा रचला व काल दिनांक १६/०९/२०२१ ला आशिष उत्तमराव शिंदे (३२) ग्रामीण गृहनिर्माण अभियंता  याना दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपूर यांनी रंगेहात पकडले. आरोपी विरुध्द पोलीस स्टेशन जिवती येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही रश्मी नांदेडकर, पोलीस अधीक्षक , मिलिंद तोतरे, अप्पर पोलीस अधीक्षक, लाप्रवि नागपूर तसेच अविनाश भामरे, उपअधीक्षक लाप्रवि चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात शिल्पा भरडे, पोलीस निरीक्षक व त्यांची चमू करीत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!