अडेगाव येथे फांगिंग मशीनने फवारणी… निर्जंतुकीकरण करण्यासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार

466

गोंडपीपरी: तालुक्यातील अडेगाव येथे नागरिकांना साथीच्या रोगाची लागण होऊ नये या करिता ग्राम पचायत अडेगाव च्या वतीने आज दि.16 सप्टेंबर रोज गुरवारला वॉर्डा मध्ये धूर फवारणी करण्यात आली.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. ह्या दिवसात हिवताप, डेंगू, मलेरिया, यासह विविध साथ रोगांची लागण होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे ग्रामस्थाना कोणत्याही रोगाची लागण होऊ नये याकरिता गावात धुरयुक्त फवारणी करण्यात आली.