Advertisements
प्रितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)
Advertisements
आलापल्ली: दिना नदीच्या परिसरात दारूच्या हातभट्टया लावल्याच्या गोपनीय माहितीवरून अहेरी पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह ४ लाख ९८ हजारांची दारू जप्त केली. ही कार्यवाही अहेरी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
परिसरात हातभट्टीतून दारू काढणारे शंकर मंचलांवार रा. बोरी, श्यामराव तलांडे रा. रायपूर यांना ताब्यात घेण्यात आले असून पोचा सुलांवार, चंदा येलांवार, पोचा उपटलावार, शंकर वेर्लावार सर्व रा. बोरी फरार आहेत. विविध कलमानुसार अहेरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
Advertisements
Advertisements