HomeBreaking Newsमेटेजांगदा येथे घरात शिरलेला बिबट्याला जेलबंद..... 

मेटेजांगदा येथे घरात शिरलेला बिबट्याला जेलबंद….. 

 

धानोरा :-
गावालगतच्या जंगलातुन कुत्र्याचा पाठलाग करत
पहाटे ३.४५ च्या सुमारास मेटेजांगदा येथील फगु बोगा यांच्या घरात शिरलेल्या बिबट्यास अखेर जेरबंद करण्यास नवेगांव व नागझिरा येथून आलेल्या रेस्क्यु टिमला यश आले. यामुळे परीसरातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मेटेजांगदा येथील फ्यू घसून बोगा यांची पत्नी बनईबाई बोगा ही आपल्या घराचा दार उघडा ठेऊन झोपली होती. दरम्यान बिबट्या घरात घुसला. कुत्रा व बिबट्याच्या
झटापटी मुळे वनईबाईला जाग आली. बिबट्या घरात घुसल्याचे तिच्या लक्षात आल्याने क्षणाचाही
विलंब न करता ती घराबाहेर पडली व सोबत कुत्राही बाहेर पडला. यानंतर तिन ताबडतोब दार बंद केले. गावातच राहत असलेला वनमजुर शांताराम कुमोटी याला बोलावून वन विभागाच्या वरीष्ठ कर्मचारी व अधिकाऱ्यांना फोन वरून सुचना देण्यात आली. वन कर्मचारी व अधिकारी पहाटेच गावात पोहचल्यानंतर गस्त लावण्यात आली. बिबटयाला जेरबंद करण्यासाठी अधिकची कुमक व पिंजरा बोलाविण्यात आला. वनरक्षक काशीवार यांना माहिती
देण्यात आल्यानंतर मोहलीचे क्षेत्रसहाय्यक एन.एच. बन्सोड, वनरक्षक चौव्हाण, मोनी कोडापे, स्वाती बंजारी यांनी बंदोबस्त लावला. उत्तर धानोराचे
वनपरीक्षेत्राधिकारी वसंत मेडेवार, सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके यांनी नवेगांव नागझिरा टायगर रेस्क्यु टिमचे वनपरीक्षेत्र अधिकारी दिलीप कौशीक व त्यांच्या चमुला पाचारण केले.
या चमुने आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास बिबट्याला जेरबंद केले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येईल असे वनपरीक्षेत्र अधिकारी दिलीप कौशिक यांनी सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!