Homeसिरोंचासिरोंचा आलापल्ली मार्ग 24 तास ठप्प....

सिरोंचा आलापल्ली मार्ग 24 तास ठप्प….

 

सिरोंचा :-
सिरोंचा आलापल्ली या 100 किमी राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. याबाबत सातत्याने ओरड होत असतांना संबंधित विभाग मात्र मुंग गिळून आहे. यातच मंगळवारी याच मार्गावरील कंबलपेठा- रोमपल्ली गावाच्या जवळ तीन मोठे ट्रेलर चिखलात फसल्याने तब्बल 24 तासापासून वाहतूक ठप्प पडली आहे. यामुळे प्रवाशांसह वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सिरोंचा आलापल्ली या महामार्गावर मोठ-मोठे खड्डे प्रवासी व वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. सिरोंचा जवळून वाहणाऱ्या गोदावरी, प्राणहिता आणि इंद्रावती नदीवर मोठे पुलाचे बांधकाम झाल्याने तेलंगणा, तामिळनाडू,कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यातील चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद विजयवाडा सारख्या औद्योगिक शहरातून मोठ-मोठे मशिनरी आणि मालवाहक ट्रक तसेच छत्तीसगड राज्यातून अवजड वाहनांचे नेहमीच मार्गावरून आवागमन सुरु असते. या
अवजड वाहनामुळे सदर महामार्ग पूर्णतः खड्डयात गेले आहे. परिणामी दुचाकी, चारचाकी व इतर वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. याचा फटका अहेरी गडचिरोली- चंद्रपूर जाणाऱ्या प्रवाशांना फटका बसत आहे.मंगळवारी 30 किमी सिरोंचापासून अंतरावरील कंबलपेठा रोमपल्ली गावाच्याजवळ चिखलात फसलेले तीन मोठे ट्रेलर अद्यापही हटविण्यात न आल्याने सिरोंचा-आलापल्ली हा मार्ग मागील 24 तासांपासून ठप्प पडला आहे. वृत्त लिहिस्तोवर मंगळवारी सायंकाळपर्यंत मार्गावरील वाहतूक सुरळित सुरू झाली नसल्याची माहिती आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!