इंडिया दस्तक न्युज टिव्हीचा दणका रेगडी येथील उपकेंद्राचे ट्रान्सफॉर्मर गेले दुरुस्तीला..

0
172
Advertisements

ब्युरोचिफ प्रशांत शाहा

चामोर्शी: तालुक्यातील रेगडी या गावात मागील सहा महिन्यांपूर्वी 33/11केव्ही उपकेंद्रा निर्माण करण्यात आले होते. हे उपकेंद्र 3 ऑगस्ट 2021 रोजी सुरू करण्यात आले. मात्र अवघ्या एका महिन्यातच हे उपकेंद्र बंद पडले. मागील आठवड्यात या उपकेंद्राचे ट्रान्सफॉर्मर निकामी झाले।

या नंतर रेगडी परिसरात घोट येथून विद्युत पुरवठा देण्यात आला. रेगडी परिसर खूब मोठा असल्याने घोट येथून आलेली विद्युत पुरवठा कमी दाबेचा असते व वारंवार पुरवठा खंडित होत असते. या विषयी महावितरण निष्काळजी करत असल्याचे परिसरातील नागरिक नाराजी व्यक्त करत होते. आणि आंदोलन करण्याची तयारी केली अशी बातमी इंडिया दस्तक न्यूज टीव्हीने प्रकाशित करताच अवघ्या काही वेळातच महावितरण जागी झाले व ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करिता हलवले.

Advertisements
  1. लवकरच रेगडी येथील उपकेंद्र सुरू होणार अशी माहिती महावितरण चे सहायक अभियंता यांनी दिली आहे
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here