Homeचंद्रपूरकोरपनाप्रियकराशी शय्या करताना रंगेहात सापडली आणि मृत्यूला आमंत्रण देऊन बसली...कोरपना तालुक्यातील धक्कादायक...

प्रियकराशी शय्या करताना रंगेहात सापडली आणि मृत्यूला आमंत्रण देऊन बसली…कोरपना तालुक्यातील धक्कादायक घटना..

कोरपना प्रतिनिधी- माणिकगड पहाडाच्या पायथ्याशी वसलेल कोरपना तालुक्यातील थिप्पा गाव. येथील एका महिलेचे लग्न तेरा वर्ष पूर्वी अय्या कोडापे यांच्याशी झाल. मात्र काही कारणास्तव त्यांचा मृत्यू झाला. नंतर तिचे गावातील एका व्यक्तीशी प्रेम संबंध जुडले.

दरम्यान घरच्याच्या ओळखीतील एका व्यक्तीच्या मध्यस्थी तून त्या महिलेने गणेश मडावी नामक व्यक्तीशी २०२० मध्ये लग्न केलं. ३० तारखेला रात्री संगीता ही प्रियकरासोबत शय्या करताना रंगेहात सापडली. त्याने रागाच्या भरात तिच्या डोक्यावर दगड टाकला . यात ती बेशुद्ध झाली. दुसऱ्या दिवशी तिला कोरपना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरनी विचारपूस केल्यास त्यांच्यासोबत असलेले आई-वडील भाऊ यांनी ही घरी घसरून पडली अशी माहिती दिली. महिलेला चंद्रपूर रेफर करण्यात आले. मात्र तिच्या उपचारादरम्यान दिनांक 7/9/2021रोजी मृत्यू पावली. त्यानंतर पोस्टमार्टम करण्यात आले.

त्याची माहिती कोरपना पोलीस स्टेशनला देण्यात आली. व सदर चौकशी करण्याकरिता त्या ठिकाणी पोलिस पोचले व विचारपूस करण्यात आली घरच्या मंडळींकडून तीच माहिती देण्यात आली. मात्र पोलिसांना संशय आल्यामुळे पहिल्या पतीची मुलगी कल्पना वय 8 वर्ष व मुलगा पाच वर्ष यांना विचारना केली असता. संपूर्ण घडलेली माहिती पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.

यादरम्यान आई वडील भाऊ यांची उलटतपासणी पुन्हा तो कित्ता त्यांनी गिरविला. मात्र लागलीच घटनेची माहिती दिली. मात्र त्या नवऱ्याचं कसल्याही प्रकारची ओळख आधार कार्ड व फोटो नसल्यामुळे व तो कुठला आहे याची माहिती नव्हती. फक्त आरोपी चे वडील बेला तहसील मधील उपसा नाला येथे शेतात सालगडी आहे अशी माहिती मिळाली.

कोरपना पोलीस घटनास्थळी पोचले व माहिती काढण्यात आली. त्यादरम्यान शेतातील एका बंड्यावर सालगडी होता. पण तो एक महिन्यापूर्वी गावी गेला. पोलिसांनी त्याचे मुळगाव जामडोह जिल्हा यवतमाळ गाठून त्याला ताब्यात घेतले. आरोपी यांनी गुन्हाचा पूर्ण घटना सांगून आरोपीने गुन्हा कबूल केला. त्याला पथकानी जामडोह, यवतमाळ येथून कोरपना पोलीस स्टेशनला आणण्यात आले.

आरोपीला अटक करण्याकरता जाधव ,संजय शुक्ला, रामा पुष्प पोळ यांनी कामगिरी बजावली. व त्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा संपूर्ण तपास जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस निरीक्षक सदाशिव ढाकणे व कोरपना पोलिसांनी केला

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!