आमदार सुभाष धोटे यांना मुस्लिम समाजाच्या मागण्याचे भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या वतीने दिले निवेदन

377

दिपक साबने,जिवती

जिवती: तालुका स्तरीय आढावा सभा आज दि. ८ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय जिवती येथे आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष भाऊ धोटे हे होते. जिवती तालुक्यातील शेणगांव येथील मुस्लिम सामाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनात मुस्लिम समाजासाठी मुस्लिम समाज भवन, मुस्लिम ग्रंथालय,कब्रस्तानाला संरक्षण भिंत, जनाजा नमाजपठण करण्याकरिता खुले सभामंडप आणि शाही ईदगाहला ईदची नमाज पठण करण्याकरिता ईदग्यावर जाण्यासाठी डांबरीकरण रस्ता इत्यादी मागण्या नमूद आहेत.
मुस्लिम समाजाचे धार्मिक, सामाजिक, व शैक्षणिक भावना व गरजा समजून घेऊन मुस्लिम समाजातील रास्त मागणीला आपण लक्ष वेधून आमच्या मागण्या मान्य करून पुर्ण कराव्या असे निवेदन भारतीय स्वराज्य पॅंथर सेनेच्या संस्थापक अध्यक्ष सय्यद शब्बीर जागीरदार यांनी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांना दिले.
आमदार सुभाष धोटे यांनी निवेदनात नमूद सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
तालुका स्तरीय आढावा सभेत जिवती पंचायत समितीचे सभापती अंजना पवार, तहसीलदार अतुल गांगुली, नगरपंचायत चे मुख्याधिकारी मॅडम, अन्नपुरवठा विभागाचे गंभीरे मॅडम, तालुका अन्नपुरवठा अधिकारी मेश्राम साहेब , भिमराव पाटील मडावी, काॅग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष गणपत आडे, सुनील मडावी, सुग्रीव गोतावळे, माजी सरपंच कलीम शेख, ताजुदीन शेख, दक्षता समिती चे सदस्य, स्वत धान्य दुकानदार, तहसील कार्यालयाचे कर्मचारी इत्यादी उपस्थित होते