राजू डाहुले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित..

0
30

राजुरा..महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथील अष्टपैलू शिक्षक राजू किसनराव डाहुले यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जेसीआय राजुरा रॉयल्स तर्फे शिक्षक दिनानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पीडब्ल्यूडी सभागृह बल्लारपूर येथे पार पडलेल्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री डाहुले यांचा शाल, श्रीफळ प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

श्री डाहुले हे महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय येथे क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या शैक्षणिक कालखंडात अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले आहे. स्वतः उत्कृष्ट क्रीडा शिक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे.
विद्यार्थीदशेत सन 1987 मध्ये हैदराबाद येथे झालेल्या स्कॉउट & गाईड 10 वी एशिया पॉसिपिक जाम्भोरी नॅशनल कॅम्प मधे महाराष्ट्रीयन ट्रूप मध्ये परेड संचलना करिता निवड झाली होती. भारताचे प्रथम नागरिक (राष्ट्रपती) स्व.ज्ञानी झैलसिंघ यांना मानवंदना देण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे. एक सामान्य क्रीडा शिक्षक ते राज्य क्रीडा मार्गदर्शक म्हणून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे.
महाराष्ट्र शारीरिक शिक्षक समन्वय समिती पुणे व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ अहमदनगर या दोन्ही समितीचे ते कोर कमिटी सदस्य आहेत.
ते विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनाचे तालुका अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे डिसेंबर 2018 मध्ये अगरतळा (त्रिपुरा ) येथे झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 17 वर्ष खालील मुली (फुटबॉल संघ) महाराष्ट्र संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून त्यांनी उत्कृष्ट कार्य केलेले आहे.
त्यांच्या शैक्षणिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शिक्षक दिनी त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्कराबद्दल संस्थाध्यक्ष जयंतराव साळवे, संस्था सचिव सुभाष ताजणे, संस्थेच्या विश्वस्त नलिनीताई साळवे प्राचार्य सुधाकर उईके,
महासंघाचे राज्यध्यक्ष राजेंद्रजी कोतकर,विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, तथा जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here