Advertisements
कोरपना: तालुक्यातील सोनूर्ली येथील तरुण शेतकऱ्यांने पोळ्याच्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ माजली आहे.
Advertisements
आत्महत्या केलेल्या तरुण शेतकऱ्यांचे नाव अजय चहारे (२५) असून हा होतकरू तरुण शेतकरी होता. त्याने काल सायंकाळच्या सुमारास आत्महत्या केल्याचे माहिती झाले. काही दिवसापूर्वीच अजय चे लग्न झाले होते. त्याच्या पाठीमागे त्याची पत्नी, आई, वडील असा परिवार आहे.
मृत्यूचे कारण अजून कळाले नाही. पोलिस घटनास्थळी पोहचले असून पुढील तपास सुरू आहे .
Advertisements
Advertisements