शेखर बोनगिरवार (चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधी)
गोंडपिपरी:- गोंडवाना विद्यापिठ, गडचिरोली कडून घेण्यात आलेल्या विधी पदवी परिक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. यामध्ये मुळचा चेक दरुर तह गोंडपिपरी येथील रहिवासी कालिदास बंडूजी लाटेलवार या परिक्षेत प्रथम श्रेणी प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे.
गोंडपिंपरी तालुक्यातील मादगी समाजात विधीचे शिक्षण घेणारा हा पहिलाच युवक असून गोंडपिपरी मादगी समाजातील कालिदास लाटेलवार हा पहिला वकील ठरला आहे. कालिदास लाटेलवार यांचे वडील भूमिहीन असून ते परंपरागत मादगि व्यवसाय करतात. कालिदास यांचे प्राथमिक शिक्षण चेकदरूर, माध्यमिक शिक्षण करंजी आक्सापुर आणि महाविद्यालयीन शिक्षण चंद्रपूर येथे अत्यंत हालाखीच्या परिस्थीतीत झाले.
त्यांनी Ded, BA, BCCA, MBA , MCA (ignu) पदविकेचे शिक्षण पूर्ण केले असून पदविकेते विद्यापिठातून पहिला येण्याचा मान त्यांनी पटकावला होता. ते त्यांच्या समजाजातील उच्च शिक्षित आहेत.
कालिदास यांना मिळालेल्या यशाचे श्रेय त्यांनी आई-वडील, लहान भावांना महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती अंजली हस्तक, उपप्राचार्य शेख सर, प्राध्यापक डॉ. अभय बुटले, डॉ. पंकज काकडे, डॉ. अश्विनी बलकी, अॅड. फरात बेग, अॅड. पंकज बजाज व अन्य प्राध्यापकांसह समाजातील बांधवांना दिले आहे. त्याच्या या यशाबद्दल समाजामधून कौतूक व्यक्त केल्या जात आहे.