पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश..

341

चंद्रपूर . युवक कॉंग्रेस जिल्हा महासचिव रमीज शेख व्दारा आयोजित पक्ष प्रवेश पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि युवक कॉंग्रेस प्रदेशचे महासचिव शिवानी वडेट्टीवार यांच्या हस्ते असंख्य युवकांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला.

सध्या गोरगरिबांच्या ध्येय धोरणामुळे जनता कॉग्रेसकडे वळत आहे,असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले की, केंद्र सरकारच्या धेयधोरणाला जनता कंटाळली आहे.महागाईने कळस गाठल्याने जीणे हराण झाले आहे.त्यामुळे मोदीसरकारविरूध्द संतापाची भावना निर्माण झाली आहे.

युवक कोंग्रेस प्रदेश महासचिव शिवानी ताई वड़ेट्टिवार म्हणाल्या की, धर्माच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणाचा विरोध करून आपला देश सर्वधर्मसमभाव व एकतेने काम करणारा आहे.

यावेळी प्रामुख्याने ग्रामीण ज़िल्हाअध्यक्ष प्रकाश देवतले,शहर ज़िल्हाध्यक्ष रितेश रामू तिवारी,महिला प्रदेश सचिव नम्रता आचार्य ठेमस्कर, नगरसेविका सुनीता लोडिया,महिला कोंग्रेस ज़िल्हाअध्यक्ष चित्राताई डांगे,युवक कोंग्रेस प्रदेश सचिव सचिन कत्याल, रचित दवे, ज़िल्हाध्यक्ष हरीश कोत्तावार, इंटक ज़िल्हाअध्यक्ष प्रशांत भारती, विधानसभा अध्यक्ष राजेश अड्डूर, ज़िल्हा महासचिव सूरज कण्णूर, सचिव अक्षय मिस्त्री, इंटक शहर अध्यक्ष जूनैद शेख़, घुगुस शहर अध्यक्ष तौफ़ीक़ शेख़., राजु वासेकर, हाजी हारुन उपस्थित होते. संचालन नौशाद सिद्दीकि यांनी केले.