Home एटापल्ली बापरे: चक्क त्यांनी शेतात लपविली होती अडीच लाखांची दारू...

बापरे: चक्क त्यांनी शेतात लपविली होती अडीच लाखांची दारू…

एटापल्ली :- तालुक्यातील कसनसूर उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका शेतशिवारात तब्बल अडीच लाख रुपयांची दारू लपवून ठेवली असल्याचे उघडकीस आले. गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा मारून दारूसाठा जप्त करत एका आरोपीला अटक केली. तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी झाला.

जायजोन सॅम्युअल टोपो (५५) रा.वेनासर, ता. एटापल्ली असे अटक केलेल्या तर मनोज जगदीश मुजुमदार रा. एटापल्ली असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. वेनासर येथील शेतशिवारात असलेल्या आरोपीच्या झोपडीत दारूसाठा लपवून ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी दोन साक्षीदारांसह झोपडीची तपासणी केली. त्यात गोवा विस्की कंपनीच्या १८० मिलीच्या देशी विदेशी दारूच्या १६८० नग निप आढळल्या. त्यांची किंमत २ लाख ५२ हजार रुपये आहे. या ठिकाणावरून दारूचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांना केला जात असल्याचे तपासात समोर आले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, ज्ञानेश्वर धनगर, महेश गरड तसेच पोलीस हवालदार राजू उराडे, नायक सुनील मडावी, शिपाई धरमदास भुसारी, संजय देशमुख लक्षण तरंगे यांनी केली.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

धानाच्या पुंजण्याला आग…आगीत संपूर्ण धान व टॅक्टर जळून खाक

ब्युरोचीफ प्रशांत शाहा *गडचिरोली: एटापल्ली तालुक्यातील जारावंडी येथील शेतातील धानाच्या पुंजण्याला आग लागून शेतातील धान व ट्रॅक्टर जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 18 जानेवारी...

नक्षलवादी एक्शन टीम सदस्य अजय हिचामी यास गडचिरोली पोलिसांकडून अटक…

  एटापल्ली :- हेडरी पोलीस उपविभागा अंतर्गत जांबिया गट्टा पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत सोमवारी गडचिरोली पोलीसांचे विशेष पथक सी-६० हे नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना गोपनिय...

सुरजागड लोह खनिज ब्लास्टिंग द्वारे खोदन्यास नागरिकांनी आक्षेप नोंदविले.

चक्रधर मेश्राम {सहसंपादक) एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाड़ीवरील लोहखनिज खाणीमध्ये ब्लास्टिंग द्वारा खोदकाम करण्यास " में लाॅयलड्स मेटल अँड एनर्जी लिमीटेड " कंपनीला परवानगी देण्याच्या प्रस्तावा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

यूजीसी नेट’च्या अर्जासाठी ३० मेपर्यंत मुदतवाढ

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना ३० मेपर्यंत अर्ज भरता येईल. यूजीसीचे अध्यक्ष प्रा....

राष्ट्रवादीच्या पती- पत्नी नगरसेवकानी प्रभागाच्या विकासासाठी मागितला दोन कोटींचा निधी…

गोंडपिपरी(सुनील डी डोंगरे) येथील नगरपंचायतीचे नगरसेवक महेंद्रसिंह चंदेल ,त्यांच्या नगरसेविका पत्नी सौ सविता महेंद्रसिंह चंदेल यांनी आपापल्या प्रभागाच्या विकासासाठी दोन कोटी रु च्या निधीची मागणी...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच मंत्राचा कोलामगुड्यावर मुक्काम;कोलम बांधवांच्या जाणून घेतल्या व्यथा…

बळीराम काळे /जिवती जिवती:जिल्ह्यातील अतिदुर्गम,अतिमागास,आदिवासी बहुल, दुर्गम भागातील सितागुडा या कोलामगुड्यावर बच्चू कडू,राज्यमंत्री यांनी त्यांच्यासोबत मुक्काम ठोकला. स्वातंत्र्यानंतर एखाद्या मंत्र्यांनी भेट देऊन आदिवासी गुड्यावर मुक्काम...

Recent Comments

Don`t copy text!