HomeBreaking Newsराष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पदी अभिजित प्रभाकरराव कुडे यांची नियुक्ती...

राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पदी अभिजित प्रभाकरराव कुडे यांची नियुक्ती…

Advertisements

वरोरा:– राष्ट्रवादी युवक काँग्रेस ७५– वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्र अध्यक्ष पदी अभिजित प्रभाकरराव कुडे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस विधनासभा अध्यक्ष विलास भाऊ नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली . राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भटारकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी सौरभ घोरपडे , अतुल कोठारे , गणेश भाउ बावणे उपस्थित होते.
अवघ्या वयाच्या विसाव्या वर्षी विधानसभा अध्यक्ष पदावर भरारी. शाखा प्रमूख तालुका उपाध्यक्ष ते विधानसभा अध्यक्ष पद हा संघर्षमय प्रवास करत अभिजित कुडे यांनी आपले अस्तित्व सिद्ध करुन दाखविले आहे , सर्व सामान्य शेतकरी पुत्राची ही गरुड झेप घेतली आहे .

Advertisements

आपल्या आजोबांचा वामनराव कुडे सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत त्यांनी न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे माध्यमातून सामाजिक कार्य करत आहे त्याच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पद व पुरस्कार प्रदान करण्यात आले . सर्व सामान्य शेतकरी पूत्र असलेले अभिजित हे आपल्या कामाने अनेकांना भुरळ घालत असतात , रस्त्यांचे, शेतकऱ्यांचे, निराधार, अपंग, विद्यार्थि सगळ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम अभिजित करत आहेत . त्यांच्या कामाच्या वेगळ्या शैली मुळेच अल्प काळातच त्यांनी स्वतःची वेगळी छाप पडली आहे.त्यांच्या नियुक्ती बदल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!