Advertisements
पोंभुर्णा: गेल्या दोन वर्षांपासून शाळा,कॉलेज बंद असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळत नाही आहे. म्हणून अश्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक संधी मिळाली या उद्देशाने स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने भूमिपुत्र ब्रिगेड आणि लक्ष्यभेद कोचिंग क्लासेस पोंभुर्णा यांनी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
Advertisements
विविध स्पर्धेचे परीक्षक म्हणून सुरज दहागावकर, आशिष प्रतापगिरीवार, विशाल कोवे, प्रतीप कोडापे यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी कोरोनाचे नियम पाळून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते .
यावेळी श्रीकांत शेंडे, प्रशांत गोंगले, विशाल कोवे, स्नेहल गेडाम, भूषण बुरांडे, रुपचंद गुरनुले, शुभम नीखाडे, नवोदय कोप्पवार, पंकज कोटरंगे, आणि इतर उपस्थित होते…
Advertisements
Advertisements