प्रियंका ठाकरे यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कारासाठी निवड…

0
137

– गौरव लुटे
आरमोरी तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या १९९३-९४ या रौप्य महोत्सवी वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत निस्वार्थ पणे ,तत्परतेने समाजासाठी सेवा देणाऱ्या व त्यांना प्रोत्साहित करून गौरव करण्याच्या दृष्टीने हा पुरस्कार प्रदान केला जातो.

राज्यशासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा २०२१ – २२ चा राज्यस्तरीय सर्वोकृष्ट विद्यापीठ पुरस्कार चा मान गोंडवाना विद्यापिठाला मिळाला आहे.

म.गांधी.व एनपी महाविद्यालय आरमोरी येथील विद्यार्थिनी प्रियंका शामराव ठाकरे यांची राज्यस्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.‌ प्रियंका ही वडसा तालुक्यातील कोंढाळा इथली आहे ती विविध स्पर्धेत सहभागी होत असते.तिला आजवर राज्यस्तरावर व विद्यापीठ स्तरावर अनेक पुरस्कार व सन्मानपत्र मिळाले आहेत.

वक्तृत्व, संचालन नृत्यात तिचा हातखंडा आहे. उत्कृष्ट रासेयो पुरस्काराने आता पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यामुळे तिच्यावर विविध श
क्षेत्रांतून कौतुकांचा वर्षोव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here