Homeसिरोंचासिरोंचा पं.स.ला शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देऊ- जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार...

सिरोंचा पं.स.ला शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देऊ- जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार…

सिरोंचा- आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार हे बुधवारला सिरोंचा पंचायत समितीची विभाग प्रमुखांची आढावा सभेसाठी सिरोंचा दौऱ्यावर आले होते.

सिरोंचा पंचायत समितीकडून आयोजित सर्व विभागाचे विभाग प्रमुखांची आढावा सभा आटोपल्यानंतर येथील आविसचे स्थानिक कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या मालकीच्या खुल्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम करून येथील व्यवसाय करण्यास इच्छुक असलेल्या सुशिक्षित तरुणांना गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्याकडे केली असता कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन जि.प.अध्यक्षांनी पंचायत समितीला लागूनच असलेल्या दोन जुने कोंडवडे ,पडीत गोदामाची तसेच बँक ऑफ इंडिया समोरची पडीत असलेल्या बचत भवन या दोन्ही ठिकाणची जागेची त्यांनी स्वतःहून पाहणी केली.पाहणीनंतर त्यांनी प्रभारी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना पडीत गोदाम,बचत भवन सह कोंडवडे निर्लेखीत प्रस्तावासह दोन्ही ठिकाणी तब्बल दोनशे गाळे बांधकामासाठी लागणारे आवश्यक निधीची मागणीचे प्रस्ताव ही जिल्हा परिषदेला तात्काळ सादर करण्याचे निर्देश दिले.

नगरपंचायत ला पंचायत समितीचे मालकीची इंचभर जागाही देऊ नये व पंचायत समितीच्या जागेवर असलेल्या सर्व अतिक्रमण काढायला ही प्रभारी अधिकाऱ्यांना सांगितले.

सिरोंचा पंचायत समितीचे मालकीचे जागेची पाहणी दरम्यान *जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार* यांचे समवेत प्रभारी संवर्ग विकास अधिकारी विकास घोडे, पंचायत व शिक्षण विभागाचे अधिकारी,आविसचे ज्येष्ठ नेते मंदा शंकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आकुला मल्लिकार्जुनराव,आविस तालुका अध्यक्ष बानय्या जनगम, आविस सल्लागार रवी सल्लम,मारोती गणापूरपू,श्याम बेज्जनीवार,साई मंदा,उपसरपंच अशोक हरी,तिरुपती चिट्याला,किरण वेमुला,सरपंच सुरज गावडे,सरपंच लक्ष्मण गावडे,लक्ष्मण बोल्ले रवी बॉंगोनी आदी उपस्तित होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!