कृषी विभाग गोंडपीपरी तर्फे रानभाजी महोत्सव साजरा…

0
340

शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी

आज दिनांक 9 ऑगस्ट 2021 रोज सोमवारला तालुका कृषी अधिकारी कार्यालय गोंडपीपरी येथे रान भाजी महोत्सव साजरा करण्यात आला. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित रानभाजी महोत्सव सप्ताह तालुका कृषी अधिकारी कार्यालय परिसर तालुका गोंडपिपरी जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता.

गोंडपीपरी तालुक्यातील गावागावातील शेतकरी रानभाज्या आणून प्रदर्शनाचे स्टॉल लावले. अनेकांनी त्या रानभाज्या खरेदी केल्या. रांनभाजी महोत्सव सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष म्हणून गोंडपिपरी तालुका पंचायत समिती सभापती सौ सुनिता येग्गेवार मॅडम, प्रमुख उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद सदस्य सौ स्वाती वडपल्लीवार मॅडम, पंचायत समिती सदस्य सौ भुमिताई पिपरे, पंचायत समिती सदस्य श्री मनीषजी वासमवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपिपरी तालुक्याचे नायब तहसीलदार श्री प्रवीण जमदाडे उपस्थित होते..

कार्यक्रमाचे प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी श्री मंगेश पवार, यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी श्री सचिन पानसरे आणि श्री प्रमोद गोल्हाईत यांनी केले. या कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक श्री प्रफुल्ल आडकिणे, श्री किशोर टोंगलवार यांनी उत्तम रित्या नियोजन केले, श्री गोकुळ पाटील कृषी पर्यवेक्षक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सहभागी शेतकरी आणि कार्यालयाचे सर्व कृषी सहाय्यक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here