Homeअमरावतीजो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार.. पिस्तुल घेऊन विडियो काढणे पोलिसाला...

जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार.. पिस्तुल घेऊन विडियो काढणे पोलिसाला महागात पडले…

प्रतिनिधि दिलीप सोनकांबळे
अमरावती : अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी शासकीय गणवेशामध्ये हातात पिस्टलसारख्या शस्त्राचा वापर करून व्हिडीओ तयार केला. सदरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. शासकीय गणवेशाचा आणि शस्त्राचा गैर उपयोग केल्याचे बेशिस्त आणि बेजबाबदार वर्तनाबदल पोलिस अंमलदार महेश काळे यांना पोलिस अधीक्षक डॉ हरि बालाजी अमरावती ग्रामीण यांनी निलंबित केले आहे. परवा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि काल सायंकाळी पोलीस अधीक्षक यांनी कारवाई केली.

अमरावती जिल्ह्याच्या चांदूरबाजार येथील पोलिस महेश मुरलीधर काळे यांनी शासकीय गणवेशामध्ये हातात पिस्टलसारख्या शस्ञाचा वापर करून व्हिडीओ तयार केला आहे.
हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
स्वतःला बाजीराव सिंघम’ समजून हाती पिस्टल घेऊन स्टंट करणाऱ्या अमरावतीच्या चांदूर बाजार येथील पोलिस कॉन्स्टेबलला या स्टंटबाजीची मोठीच किंमत चुकवावी लागली आहे. या पोलिस कॉन्स्टेबलच्या ‘स्टंट’चा व्हीडिओ व्हायरल होताच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ हरी बालाजी एन. यांनी तत्काळ या कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई केली आहे. इतकेच नव्हे तर सर्वच पोलिस ठाण्यांना सूचना देऊन, ‘तुमच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांचे असले प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत..’ असा कडक दम देखील दिला आहे. सध्याचा काळ हा सोशल मिडियाचा वेगवान काळ आहे. अगदी बारीक-सारिक गोष्टी ही लपता लपत नाहीत. खासगी गोष्टी केव्हा जाहीर होतील, सांगता येत नाही. त्याचे काय परिणाम होतील.. काही सांगता येत नाही.

*या व्हिडीओत नेमकं काय म्हटलंय*
‘अमरावती जिल्ह्यात प्रवेश करताना दादागिरी आणि भाईगिरी दहा किलोमीटर लांबच ठेवून यायचं भाऊ.. अमरावतीत जो कायद्यात राहणार तोच फायद्यात राहणार.. कारण कसंय ना कायद्याचा बालेकिल्ला, ओन्ली अमरावती जिल्हा..’ असं या व्हिडीओत म्हटलं आहे. हा व्हिडीओ करताना काळे हे पोलिसांच्या शासकीय गणवेशात आहेत. सोबतच त्यांच्या हातात एक पिस्तुल देखील दिसत आहे. सोशल माध्यमावर जरी या व्हिडीओला पसंती मिळत असली तरी काळे यांना मात्र या व्हिडीओमुळं निलंबित केलं आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!