HomeBreaking Newsमुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात...कंटेनर चालक जागीच ठार...

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात…कंटेनर चालक जागीच ठार…

प्रतिनिधि दिलीप सोनकांबळे
कणकवली : गोवा ते मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर जानवली पुलाजवळ हॉटेल बावरची समोर महामार्गाच्या डीवाईडर वर चढत पलटी झाल्याने कंटेनर चालक जागीच ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला. अपघात नेमका कसा घडला हे जरी समजले नसले तरी कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर डीवाईडर वर चढल्यामुळे पलटी झाला असावा अशी शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात पलटी झालेल्या कंटेनर खाली चालक अडकल्याने चालकाचा कमरेखालील भाग अक्षरशः छिन्नविछिन्न झाला होता. अपघाताची माहिती मिळताच कणकवली वाहतूक पोलीस संदेश आबिटकर, वैभव कोळी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
महामार्गावर पलटी झालेला तो कंटेनर हटविण्यासाठी क्रेन बोलावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!