Homeचंद्रपूरनाते आपुलकीचे संस्थेने अनुरागच्या भवितव्यासाठी दिला मदतीचा हात...

नाते आपुलकीचे संस्थेने अनुरागच्या भवितव्यासाठी दिला मदतीचा हात…

समाजातील होतकरू,गरजू आणि परिस्थितीने बिकट अशा शिक्षण घेत असलेल्या मुलाला मदतीचा हात देऊन त्याचे भविष्य उज्वल करण्याच्या दिशेने नाते आपुलकीचे संस्थेने एक हात समोर केला!
जुनासुरला तालुका मूल येथील अनुराग गोवर्धन असं त्या मुलाचं नाव! तो चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात बी.ए.द्वितीय वर्षात शिकत आहे,अनुरागला कानाच्या आजारने ग्रासले असून एक कान पूर्ण निकामी तर दुसऱ्या कानानेही त्याला स्पष्ट ऐकू येत नाही, घरी एक एकर शेती तर वडिलांना वाताची बिमारी असल्याने अंगणवाडी मदतनीस असलेली त्याची आई त्याच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेते आहे,घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्याला काम करून शिकण्याची जिद्द आहे,शिक्षणाची अत्यंत आवड असूनही कानाने ऐकूच येत नसल्याने त्याला कोणी कामावरही ठेवायला तयार नाही,आईने त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून पदरमोड करून काही खर्च केला पण शेवटी ती हतबल झाली.
नाते आपुलकीचे संस्था समाजातील अशाच गरजू विद्यार्थ्यांच्या नेहमीच पाठीशी उभी राहिली आहे,अनुरागचे पुढील शिक्षण अपुरे राहू नये आणि तो स्वतःच्या हिमतीवर उभा रहावा यासाठी संस्थेने त्याला मदत करायचे ठरवले, संस्थेचे अध्यक्ष श्री.संतोषभाऊ ताजने,उपाध्यक्ष श्री.किशनभाऊ नागरकर,सचिव श्री.प्रा.प्रमोदजी उरकुडे,संघटक श्री.महेशभाऊ गुंजेकर यांनी अनुरागला शहरातील सुप्रसिद्ध कान, नाक,घसा तज्ञ डॉ.अजय कांबडे यांच्याकडे उपचारासाठी घेऊन गेले,उपचारांती डॉक्टरांनी अनुरागला 15 हजार रुपयांच्या मशीनची आवश्यकता आहे असे सांगितले आणि इतर वैद्यकीय खर्च येईल असे सांगितले,त्यानुसार संस्थेच्या कार्यकारी तसेच सदस्यांच्या एकमताने त्याला मदत करायचे ठरले,त्यानुसार संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,सचिव तसेच संस्थेचे सदस्य मा.श्री.गणेशजी पाचभाई,मा.श्री.बबनजी बारस्कर यांच्या हस्ते अनुरागला 15 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.याप्रसंगी संस्थेच्या सेवा कार्याची डॉ.कांबडे यांनी प्रशंसा केली,समाजातील गुणवंत,गरजवंत मुलांच्या पाठीशी उभी राहून त्यांना जगण्याचे बळ ही संस्था देत आहे याचे भरभरून कौतुक केले,समाजातील प्रत्येक व्यक्तीने नोंद घ्यावी असे कार्य संस्थे मार्फत होत आहे याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!