HomeBreaking Newsब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये भर दिवसा गोळीबार..

ब्रेकिंग न्यूज: चंद्रपुरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये भर दिवसा गोळीबार..

चंद्रपूर शहराने आज भर दिवसा गोळीबाराचा थरार अनुभवला असुन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमधे एका बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार करून एका व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर शहरातील आझाद बगीचाच्या बाजुला असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या हॉटेल मधे आज्ञात बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार केला ह्यात आलेवार नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असुन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

गोळीबार होताच सदर व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शेजारीच असलेल्या एम आय मोबाईल शोरूम मधे दडून बसला. दरम्यान आरोपी पळुन जाण्यात यशस्वी ठरला असुन ह्या प्रकरणाचे तार बल्लारपूर शहराशी जोडल्या गेले असल्याचा  संशय व्यक्त केल्या जात आहे. 

गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस निरीक्षक बहादुरे व पोलीस टीम मोक्यावर दाखल झाली असुन पोलीस कारवाई सुरू आहे. 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!