Home Breaking News ब्रेकिंग न्यूज: विधानसभा अध्‍यक्षांना दालनात धक्‍काबुक्‍की; अश्‍लील शिवीगाळ : किर्तीकुमार भांगडीयासह १२...

ब्रेकिंग न्यूज: विधानसभा अध्‍यक्षांना दालनात धक्‍काबुक्‍की; अश्‍लील शिवीगाळ : किर्तीकुमार भांगडीयासह १२ आमदार एक वर्षांसाठी निलंबित…

778

पावसाळी अधिवेशनाची सुरुवात वादळी ठरली आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. त्यामुळे अखेर भाजपच्या 12 आमदारांचं निलंबित करण्यात आले आहे. 1 वर्षासाठी 12 आमदारांना निलंबित करण्यात आले असून सभागृहात ठराव मंजूर करण्यात आला आहे.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलं की, भाजपच्या आमदारांनी धक्काबुक्की केली. त्यानंतर संसदीय मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि 12 आमदार निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला.

यात संजय कुटे, आशिष शेलार, हरीश पिंपळे, योगेश सागर , गिरीश महाजन,पराग आळवणी, अभिमन्यू पवार, अतुल भातखलकर, नारायण कुचे आणि बंटी बंगडीया या आमदारांचा समावेश आहे. हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर फडणवीस यांनी हा लोकशाहीचा अपमान आहे म्हणत सभागृहाच्या कामावर बहिष्कार घातला.

Don`t copy text!