HomeBreaking Newsजिम ट्रेनर मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य केले तब्बल ८७ जणांनी रक्तदान...

जिम ट्रेनर मित्राच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्य केले तब्बल ८७ जणांनी रक्तदान…

चिंचवड : कै.प्रेम लिंगदाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
कै. प्रेम लिंगदाळे युवा मंच आणि छत्रपती शासन युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवार दि. ४ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले . चिंचवड येथील बळवंत नगर परिसरात रक्तदान शिबिर आयोजित केले होते
विद्यमान नगरसेवक शेखर अण्णा चिंचवडे, विद्यमान नगरसेवक सचिन दादा चिंचवडे , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चिंचवडे , मंडळाचे अध्यक्ष बसवराज हेळवे , धनंजय अंबुसकर , दिलीप सोनकांबळे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उदघाटन झाले .
*रक्तदान शिबिरात ८७ दात्यानी रक्तदान केले*
सकाळी १० ते ५ या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले पुणे येथील आचार्य आनंद हृषिजी ब्लड बँके चे वैद्यकीय डॉ.उघडे सर धनश्री बनकर , मोनिका जना , सुवर्णा कांबळे, विनायक बिराजदार , सागर वेल्हाळ, संकेत चव्हाण, जयश्री पवार यांनी रक्त पिशव्यांचे संकलन केले.
शिबिरासाठी आदित्य अंबुसकर ,शिवा हेळवे,प्रशांत लोनी, रोहित कुंभार, जुबेर शेख,शाम कोळी, महेश पिल्ले, अमोल बेडके,प्रतीक राडे, अनवर बागवान,खंडू बंडगर ,सोन्या धोंडे,कुंदन निकम, विनायक पोल्लपो,संजय धोंडे,आदि कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडन्यासाठी अथक परिश्रम घेतले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!