HomeBreaking Newsप्रियसीला दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिले म्हणून प्रियकराने प्रियसीला विहिरीत ढकलले...

प्रियसीला दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिले म्हणून प्रियकराने प्रियसीला विहिरीत ढकलले…

ब्युरोचिफ प्रशांत शाहा

वर्धा : दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिले म्हणून प्रियकराने एका अल्पवयीन मुलीला विहिरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये घडली आहे. खून केल्यानंतर पाच दिवसांनंतर घटना उघडकीस आली. त्यानंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आत्राम असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आर्वी शहरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले होते. आरोपी अजयने अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी त्याची प्रेयसी एका मुलासोबत बोलत होती. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं.

त्यानंतर रागाच्या भरात अजयने मुलीला जवळच असलेल्या एका विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर घटनास्थळावरून तो पसार झाला

चार ते पाच दिवसानंतर मृतदेह कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे स्थानिकांनी विहिरीत पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

अल्पवयीन मुलीची ओळख पडल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवली. त्यानंतर मारेकरी प्रियकर अजय आत्रामला अटक करण्यात आली. या प्रकरणी अजयविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!