अडेगाव येथे वटपौर्णिमेचा सण साजरा…मोठया संख्येने महिलांची उपस्थिती..

869

शरद कुकुडकर (भंगाराम तळोधी प्रतिनिधी)
गोंडपिपरी: भारतीय संस्कृतीत सणाला महत्व दिल्या जाते. सण म्हटला की, आनंद उत्साह. भारतात मोठ्या प्रमाणात सण साजरे केले जातात. अश्यातच आज दि.24 जून रोज गुरुवारला गोंडपीपरी तालुक्यातील अडेगाव येथे वटपौर्णिमेला वटवृक्ष ची पूजा करून वटपौर्णिमा सण साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
भारतीय संस्कृतीत सर्व सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्या पैकी एक म्हणजे वटपौर्णिमा! या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून पतीच्या उत्तम आरोग्यासाठी व दिर्घआयुष्यासाठी वडाच्या झाडाला सात फेरे घालून पूजा करतात…